रंग.....
बघताना मी झालो होतो दंग
आणि तुझाही बदलत होता रंग...
तू नसताना आठवणी असतातच!
तू नसताना तुझाच असतो संग...
उठून जाऊ नकोस
अर्ध्यावरुनीहोतो आहे मैफलिचा बेरंग...
रोज लढाई हरण्यासाठी लढतो;
सुरू मरेस्तो आयुष्याची जंग...
या स्वप्नांना नेहमीच मी पुसतो-
"अर्ध्यावरती का होता हो भंग?"...
तुझी प्रतीक्षा जणू परीक्षा असते;
यशात असते नशिबाचेही अंग!...
मनात असतो खोल डोह
लपलेला'अजब' तयातच उठती विविध-तरंग...